अरे ओह “हिट अँड रन” केस हुआ ना.. उसका व्हिलन कौन है रे? तेरी तो! आगया है देखो बॉडीगार्ड… हो त्याचा बॉडीगार्ड रवींद्र पाटीलच म्हणाला होता कि सलमान दारूच्या नशेत गाडी चालवत होता.
अरे काय बोलतेय हे मी.. सलमान निर्दोष आहे. एक शब्द जरी बोलले ना तरी सलमान खान चे असंख्य चाहते माझ्या वरूनच गाडी घालतील… माणूस हा स्खलनशील प्राणी आहे. हि वॉज जस्ट “बिंग ह्यूमन” बाय ड्रिंकिंग अँड ड्राइविंग…
असंख्य माणसं मुंबईत स्थलांतर करतात आणि फुटपाथ वर झोपतात. ती त्यांची चूक आहे. अब्दुल्ला कितीही रडो कि त्याचा पाय गेला… आपण आपले सलमान चे आगामी चित्रपट पाहू आणि खुश राहू!
फक्त रवींद्र पाटील स्वतःचा जीव घालवण्या पर्यंत का सलमान खानच्या जीवावर उठला हा अनुत्तरित प्रश्न सलमान खानच्या असंख्य चाहत्यांना आणि सलमान खानला.