तसं माझ्यावर कुणी रेप करेल की नाही अशी शंकाच आहे, तरीही आपलं ट्रेंड म्हणून जाता जाता बरी पोरगी नाही दिसली म्हणून माझ्यावरच रेप करून कुणी जाऊ नये म्हणून फार सावध रहाते मी. पण मी विचार केला कलियुगाचा पीक काय असेल?…….
बलात्कारी मोटिव्हेशनल बुक्स काढतील, “एकदा करून बघाच!” “ठरवा तिथे घुसवा.” इत्यादी इत्यादी.. आणि आत्मचरित्र प्रसिध्द होतील “माझे बलात्कारी जीवन – एक आठवण (मुलींना)” गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस् आणि लिम्का रेकॉर्डस् मध्ये हायेस्ट बलात्काराचे रेकॉर्डस् नोंदवले जातील. नाक्या नाक्यावर चाटे कोचिंग क्लासेस ऐवजी “शिका बलात्कार” असे ट्रेनिंग सेंटर्स उघडतील आणि तिथे डेमो आणि प्रॅक्टिकल्ससाठी मुलींना नवीन करिअर ऑपॉर्च्युनिटी ओपन होईल. सनी लिओनी, राखी सावंत अशा सेलिब्रिटीज मुलींना मोटिव्हेशनल स्पीच देतील.
मागे एकदा भ्रष्ट्राचार कायदेशीर करावा अशी टुम निघाली होती. पुढे मागे बलात्कार कायदेशीर करा ती एक गरज आहे अशीही टुम निघेल. असं काही होण्यापूर्वी भगवंता माझे डोळे मिटू दे