बाप अपुन भी अब किसी हिंदी पिक्चर से कम नही. जबरदस्त मसाला आणि “प्रेम” हा सगळ्यांचा फॉरेव्हर जिव्हाळ्याचा विषय. “टीक टीक वाजते डोक्यात, धड धड वाढते ठोक्यात” हे लहान मुलांच्या कोरस मधलं गाणं मी उडत उडत ऐकलं होतं तेव्हा मला वाटल “व्वा! परीक्षेवर गाणं बनवलं वाटतं कुणीतरी” त्यानंतर प्रत्यक्षात ते गाणं पाहिलं. लोकांनी एवढ डोक्यावर घेतलं की सोशल नेटवर्किंग चं स्टेटस “टीक टीक वाजते डोक्यात…” लोकं उगाचंच आपले “टीक टीक वाजते डोक्यात” असं पोस्ट करायला लागले आणि २००० लाईक्स. या सगळ्या वातावरणात मी माझा सुरुवातीचा गैरसमज गुपचूप दडवून टाकला जसं काही झालंच नव्हतं
पण यात बघण्यासारखा जबरदस्त आयटम होता. म्हं… लबाड!! तुम्ही जिचा विचार करताय तिच्याबद्दल बोलत नाहीय मी . मी बोलतेय…

पूर्वीच्या हिंदी pictures मधे शक्ती कपूर, प्रेम चोप्रा असा आपल्या बोलण्यातूनच नाही तर अंगा अंगातून लोचट, क्रूर वाटणारा व्हिलन बऱ्याच वर्षांनी पाहिला. डोळ्यांचं पारणं फिटलं.
तुम्हाला जो बघण्यासारखा वाटला, तो होता दुनियादारीतला दुसरा मसाला.

या dialogue नंतर मी पुढची १५ मिनट विचार करत होते चॉकलेट कोण आणि बिस्कीट कोण?? मिनू चॉकलेट? आणि सेक्सी कपड्यातली हॉट शिरीन बिस्कीट????? बहूत ना इंसाफी है. शब्दात नाही पण मनात श्रेयस ने नक्की म्हटलं असेल “

दुनियदारितला तिसरा मसाला म्हणजे मुलं! चुकून चुकून जरी मुलांनी सिनेमाच्या सुरुवातीला “श्रेयस आजोबांना भेटायला जायचं हा” असं म्हटलं असतं तर पूर्ण पिक्चर ची काशी झाली असती. सहकुटुंब सहपरिवार भेटायला जायचं ना आजोबांच्या स्मृती स्थळाला. मित्राला भेटायला जायचं असं बोलून मुलांना आणि आपल्यालाही उल्लू बनवण्यात आलय. आणि श्रेया आपल्या बॉयफ्रेंड किंवा नवऱ्या सारखंच आणि तितकच गोड, भावाशी बोलते हे अजून एक मसालेदार आश्चर्य. कोण कोणाचं कोण लागतं असं एक कोडंच सोडवण्याचा खेळ!
मसाला नंबर ४ श्रेयस. मी या पिक्चर चे रिव्ह्यू शोधत होते. रिव्ह्यूच्या शेवटी प्रश्न होते “मग श्रेयस चं लग्न मिनू बरोबर होईल? श्रेयस चं लग्न शिरीन बरोबर होईल? श्रेयस चं लग्नं होईल?” सगळी गोम शेवटी श्रेयस च्या लग्नात आहे हा साक्षात्कार मला या रिव्ह्यू मुळे झाला. बरं लग्न करून बिचाऱ्याला धड जगूही दिलं नाही.
सिनिअर श्रेयस उर्फ एम. के. उर्फ मराठी देवदास आणि नवर्याकडून रोज बलात्कार होण्याची शोककथा सांगून सतत नवऱ्यावर डाफारणारी आणि सगळ्यांवर दादागिरी करणारी त्याची एक्स जी एफ जी श्रेयस ची आई, म्हणजे मसाल्याने डोळ्यातून घळा घळा पाणी. माझ्या डोक्यात पटकन विचार आला माझ्या आईच्या एक्स बॉयफ्रेंड ला भेटून मला कसं वाटेल…. (अशा घटना पिक्चर मधेच घडोत )
मला कथांच एक काही काळत नाही. एक तर प्रेमासाठी सगळं सोडून देणारे आणि दुसरी अनेक कामं करू शकतो हे माहित नसलेले प्रेमवीर (यांना कोणी तरी सांगा हो, प्रेम सफल होऊन लग्न केलेली लोकही प्रेम सोडून बाकीच सटर फटर काही करत असतात) किंवा ध्येयासाठी आणि विधायक कार्यासाठी प्रेमाला तिलांजली देणारे नुसते वीर (म्हणजे प्रेम मायनस) बॅलन्स असा नाहीच. (हिंदी पिक्चर मधे वीधायक का काय असं काही कार्य करणाऱ्या हिरो च्या बायका पोरांना गुंड किडनॅप करतात म्हणून असेल. अरे म जास्ती हुशाऱ्या डायलॉगबाजी वगैरे न मारता कार्य करायचं ना) बरं त्याच नाव ही सुरुवातीपासून श्रेयस न म्हणता एम. के. (म्हणजे पुन्हा एकदा कोण कोणाच कोण…. ) मला राहून राहून वाटत होत. जुनिअर श्रेयस ने सिनिअर श्रेयस ला सायकिआट्रिस्टकडे न्यायला पाहिजे होतं.
शेवटी मला एकच हुरहूर लागून राहिली. मसाला नंबर ६ म्हणजेच आपल्या दिघ्याच लग्न झालं का? पिक्चर भर अशक्य वाटणाऱ्या हुशाऱ्या मारून शेवटी त्याचा एम. के. झाला का? त्याने तरी दुनियादारी चा वेगळा ट्रेंड सेट केला का…
