poems advait cover
Marathi Poems

अद्वैत


मला माहीत आहे
तू माझ्या डोळ्यात
पाणी का आणतोस…

मी तुला आठवावं
मनापासून हाक मारावी
म्हणून ना?

वेड्या
तू माझ्या कणा कणात
भिनलेला आहेस

अंतिम सत्य हेच
हे तुला कळत नाही
तोपर्यंत माझी जिद्द हरत नाही!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *