poem rosh cover
Marathi Poems

रोष !!!


जाळून घे जळून घे
थोडं तरी मरून घे
Train च्या प्रवासात
गर्दीच्या घामात
रोज स्वतःला मळून घे

जाळून घे जळून घे
थोडं तरी मरून घे

Traffic मधला धूर
खातो सगळी स्वप्न
खोट्या खोट्या A. C. ला
स्वतःमध्ये भरून घे 

जाळून घे जळून घे
थोडं तरी मरून घे

रोजचंच असतं target
फॅमिली ला खाणारं
एकदा frustrate होऊन
Boss वरती चढून घे 

जाळून घे जळून घे
थोडं तरी मरून घे

सगळी नाती बनतात
नुसत्या जबाबदाऱ्या
थोड्याश्या प्रेमात
श्वास तुझा तरू दे

जाळून घे जळून घे
मरता मरता एक क्षण जगून घे
थोडं तरी जगून घे…
थोडं तरी जगून घे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *