poem rosh cover
Marathi Poems

रोष !!!

१८
भरकटलेल्या माझ्या मना
तुला आवर घालू ती कशी
तू म्हणतोस म्हणून स्पर्धा
तू म्हणतोस म्हणून ईर्षा
ही मी नव्हेच

मी ती आहे 
जी ठरवून वागते
छान सर्वांशी
सर्वांचा आदर
सर्वांवर प्रेम
सर्वांचं कौतुक
ते जसे आहेत तसे खास!

ही मी सापडत नाही सहज
याचाच फक्त रोष…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *