poem rosh cover
Marathi Poems

रोष !!!

१९
वैताग येतो कधीतरी वैताग
सगळ्याचा वैताग
त्याच त्याच चेहऱ्यांचा
त्याच त्याच विधानांचा
दिलेल्या सल्ल्यांचा
आणि दाखवलेल्या निकामी आपुलकीचा सुध्दा

तीच तीच सकाळ 
आणि तीच तीच रात्र
तीच तीच संध्याकाळ
रेंगाळणारी फक्त

वाटतं उधळून टाकावा
सगळाच डाव
तरी पण पुन्हा होणार पहाट
तीच तीच पहाट

वैताग येतो कधीतरी वैताग
सगळ्याचा वैताग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *