poem rosh cover
Marathi Poems

रोष !!!


I just love…being alone
स्वतःची मर्जी रुसत नाही
कुणाचे सल्ले माझ्या freedom ला
डसंत नाहीत
माझ्या schedule मध्ये
दुसऱ्यांच्या इच्छा
घुसत नाहीत

I just love…being alone

बिनधास्त हव्या त्या
Movie ला जायचं
मनापासून बघून
हसायचं
टाळ्या वाजवून
मनमोकळं रडायचं
कुणाचा रुमाल नसला म्हणून
फार काही अडत नाही…

I just love…being alone

फिरायचं असेल तर
हवं तिथेच जायचं
मनमर्जीने
हवं तेच पाहायचं
दुसऱ्यांबरोबर मार्ग बदलून
हवं ते कधीच मिळत नाही

I just love…being alone

Fridge मध्ये ठेऊन
परत परत खाऊ
पण जोडीदार असेल तर
इच्छा मारून जाऊ
Restaurant मध्ये
एकटं गेलं तरीही
कुणी आपल्याकडे
बघत नाही

I just love…being alone

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *