३
मी काय करायचं
मला कुणी सांगायचं नाय!
शंभर लोकं शंभर बोलतील
त्यांचं कुणी ऐकायचं नाय
मी काय करायचं
मला कुणी सांगायचं नाय!
माझ्या निर्णयाचा म्होरक्या मीच
सहन करायची ताकद माझीच
बरोबर झालं तर हसणार मीच
चुकलं तर रडणार मीच
विचारल्या शिवाय मला सल्ले द्यायचे नाय
मी काय करायचं
मला कुणी सांगायचं नाय!
