poem rosh cover
Marathi Poems

रोष !!!


माणसांच्या chaos मध्ये
हरवलंय आयुष्य
मला काय हवंय
त्याला नाही काही भविष्य

मतांची भुतं वेडी पिशी होती
त्यातल्या काहींशी
असतात आपली नाती
ही मतं गळ्याचा घोट घेती

माझं माझं म्हणतो असं
उरलं नाही आयुष्यं…
मला काय हवंय
त्याला नाही काही भविष्य

लोकं नुसतं बोलतात
मदत नसते काडीची
आपल्याला सुध्दा
हाव नसते भिकेची

मत देण्याचा हक्क बजावून
ते गायब होतात विचित्र

माणसांच्या chaos मध्ये
हरवलंय आयुष्य
मला काय हवंय
त्याला नाही काही भविष्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *