poem rosh cover
Marathi Poems

रोष !!!


असं एक घर असावं
जे फक्त माझं व्हावं
माझा असावा तिथे रंग
नसावे कोणतेच बंध

घुसमटलेल्या मी ला
असावा तिथे आवाज
सतत नाचाचा साज
आणि गाण्यांचे राग

नसावा कोणताच discipline
माणुसकीला दाबणारा
असावा प्रत्येक क्षण
माझ्या मी ला जपणारा

असं एक घर असावं
किंवा मनातून ते कायमचं जावं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *