आज रिकाम्या रात्रीकडून
मी एक वरदान मागितलं
आयुष्याच्या आठवणीत राहावं
असं कवितेचं दान मागितलं
रात्र हसून म्हणाली
आधी स्वतःला सावर
बेधुंद भरकटणारे
विचार तुझे आवर
अनुभव तुझे
कणा कणात भरू दे
रोमांच गहिवरून
आत्मा तुझा फुलू दे
व्यक्त होईल भावना
जेव्हा मन भरून येईल
काठोकाठ हृदय भरून तेव्हा
शब्द अन शब्द ओघळून जाईल…