सीता फार वैतागली होती… हा ही व्हॅलेंटाईन फुकट जाणार… तिच्या मनात आलं ‘सौरभ ने थोडं उशिरा ब्रेक अप केलं असतं तर काय झालं असतं… माझा पहिला व्हॅलेंटाईन तरी साजरा केला असता… एक तर कुणी नसतं आणि कुणी मिळालंच तर फेब्रुवारी च्या आधी ब्रेक अप होतं… मला व्हॅलेंटाईन साजरा करायचा आहे यार….’
फ्रस्ट्रेशन मध्ये ती मोबाईल चाळू लागली… ‘यु ट्यूब, इंस्टा, एफ बी काय बघू हे विचार टाळायला… नवीन आहे का काही या जगात की तेच रटाळ आयुष्य… शी…’ ती नावीन्याच्या शोधात गुगल प्ले वर गेली… आणि तिची नजर एका ऍप वर थांबली…टिंडर… ‘करू का परत टिंडर इनस्टॉल… सगळी हपापलेली लोकं असतात तिकडे… टिंडर इज नॉट फॉर जेनुईन लव्ह… पण हा भयंकर एकटेपणा घालवायचा कसा… कॉलेज मधून सुट्टी टाकून घरी जाऊ का… आई ला घट्ट मिठी मारेन मग बरं वाटेल…’ आईच्या आठवणीने तिच्या डोळ्यात पाणी आलं… तिने डोळे पुसले, एक क्षण वर फिरणाऱ्या पंख्याकडे पाहिलं आणि तिला वाटलं ‘लाईफ ह्याज टू मूव्ह ऑन…’ तिने टिंडर इनस्टॉल केलं…
स्वाईप लेफ्ट स्वाईप राईट चा खेळ सुरू झाला… आणि मॅच…
