शालिनी अंगणात जास्वंदीच्या फुलाला अलगद कुरवाळत होती. बाबांना कळायचं नाही इतका वेळ त्या फुलांसोबत ती काय करत असते. त्यांना तर इतका वेळ स्वतःच्या बायको बरोबर घालवायलाही जमत नसे. लोकं बोलायचे, तुम्ही शालिनीला शिकवायला पाहिजे होतं स्वतःसारखं, काहीही करून. पण शालिनीला जबरदस्ती शाळेत पाठवून तिच्या मनावर ओरखडे पाडायचे नव्हते त्यांना. नाशिक मधल्या प्रसिद्ध नंबर एक च्या शाळेत तर घालू शकत होते ते तिला पण स्वतःच आयुष्य तर तिलाच घडवावं लागणार होतं. पटापट लिहिता येत नाही, अक्षर खूप घाणेरडं आहे, गोष्टी डोक्यात शिरत नाहीत म्हणून शिक्षक चिडलेले आणि शाळेतली मुलं सतत चिडवणारी. दिसायलाही सामान्य. कुणाच्या लक्षात यावं असं काहीच नाही. पण सामान्य माणसासारखं जगता आलं असतं तरी तिला चाललं असतं. पण बुद्धीमत्ता साथ देईना. तिच्या डोक्यात जसा जगातला व्यवहारीपणा शिरत नव्हता तसं गणितही शिरत नव्हतं आणि इतिहासही शिरत नव्हता. त्यातून कमालीची अबोल. शाळेत कुणी चिडवलं तरी कुणाचं नाव घेऊन तक्रार नाही. चिडवलं म्हणून सांगून हमसाहमशी रडायची फक्त. राग फार कमी, दुःख जास्त. अनेक वर्ष एक इयत्ता करत ती कशी बशी काही वर्ष शिकली. पण तिचा मानसिक त्रास आणि तिचा वाढत जाणारा अबोला बाबांना दिसत होता. कधी कधी बाबांसमोर लोकं बोलायची, तुमची मुलगी तुमच्यावर अजिबात नाही गेली. बिचारी… वगैरे वगैरे. पण तिला असं तुलनेच्या मापात तोलून तिच्यावर तोंडादेखत शेरे ओढणाऱ्यांनाही ती जणू काही समजून घ्यायला लागली होती.
Month: June 2020
मुसाफिर…
मुसाफिर मैं जिंदगी का!
जिंदगी…
जिंदगी का गाना!
काथ्याकूट
आयुष्याची काथ्याकूट!
स्वछंदी
स्वछंदी स्वछंदी स्वछंदी जगावे…
हिरा व दगड
हिरा व दगड सोबती दोघे…
प्रेम असेल नाहीतर…
त्याला माझी मला त्याची सवय झाली…
नातं
नातं असं असावं
