Marathi Poems

स्वातंत्र्य

मला देठाच्या मातीपासून
पाकळ्यांच्या सुवासापर्यंत ने
रात्रीच्या अंधारातून
पहाटेच्या आसमंतापर्यंत ने
या मर्त्य देहाचे
पारतंत्र्य संपवून
अलौकिक अविचल
स्वातंत्र्य भेट दे!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *