आज आभाळ आहे फार निळं
गवत एकदम हिरवं हिरवं
काळ्या स्वप्नाळू डोळ्यांत
स्वप्न रंगीत आगळं…
बगळ्यांची रांग
आज कशी नजरेत आली
आज सगळं वेगळंच
होऊन बसलंय काही…
प्रेम इतकं सुंदर असतं
मला नव्हतं माहिती
ऐकून होते इकडून तिकडून
फार प्रेमाची महती
पण अनुभवलं मनापासून
तेव्हाच झालं माहिती
मनात कसे रंगीत वारे
थंड थंड वाहती…
काहीच मागत नाही मन
फक्त तुला मागतं
तुझ्याशिवाय सगळं जग
मिळून न मिळाल्यासारखं !!!