मीच माझा मित्र
आणि मीच माझा सोबती
मीच माझ्या आयुष्याचा
दिशादर्शक सारथी
मीच माझ्या अंतरातलं
गुज जाणून घ्यावं
मीच जखमेवर फुंकर घालून
गोड गाणं गावं
मी जर स्वतःला समजून
मजबूत होऊ शकेन
तरच दुसऱ्याचं दुःख उमजून
आस्थेने वागू शकेन
मीच माझा मित्र
आणि मीच माझा सोबती
मीच माझ्या आयुष्याचा
दिशादर्शक सारथी
मीच माझ्या अंतरातलं
गुज जाणून घ्यावं
मीच जखमेवर फुंकर घालून
गोड गाणं गावं
मी जर स्वतःला समजून
मजबूत होऊ शकेन
तरच दुसऱ्याचं दुःख उमजून
आस्थेने वागू शकेन