आजपर्यंत खूप ऐकलंय…लग्नानंतर नवरा बिलकुल बदलत नाही, आहे तसा उनाड राहतो आणि प्रेमळ बायको मात्र बदलून महामाया होते. साहजिकच आहे ना… अनेक वर्ष प्रेम असूनही जोपर्यंत नवरा बायको होत नाहीत तोपर्यंत एकूण एक गोष्टी थोड्याच लक्षात येतात. अरेंज मॅरेज मध्ये तरी या नाविन्याचा सुरुवातीला ऍक्सेप्टन्स असतो. पण दोघे जुने झाले की टोमणे आणि वाद सुरू होतात. याला प्रेमाची भांडणं म्हटलं जातं. ही भांडणं झाली की आपण प्रेमाच्या सत्य स्वरूपात अवतरतो… आणि ते म्हणजे स्वतःच स्वातंत्र्य जपून प्रेम करणे..
प्रेम म्हणजे एक तात्पुरती भावना आहे असं समजू शकतो आपण. पण ती एक लाईफ लॉंग प्रोसेस ही होऊ शकते जर आपण पुनः एकदा प्रेमात पडलो. आणि यालाच मी म्हणते पुनःप्रेम…
प्रत्येक जोडप्याला एकनेकांच्या गुण दोषांसकट पुन्हा एकदा
प्रेमात पडायचं असतं. आणि हे प्रेम होत नाही त्यांचा होतो घटस्फोट. म्हणजे या पुनःप्रेमाचं महत्व तुम्हाला पुरेपूर कळलं असेल. हे प्रेम म्हणजे असतं प्रेमात पडायचा काँशिअस निर्णय. हा निर्णय आपण घेतो एकमेकांच्या केलेल्या सेवेतून आणि एकमेकांसाठी केलेल्या त्यागातून… हे एक महान प्रेम आहे कारण हेच आहे “लव्ह यु फॉरएव्हर!!!!’
आवडल्यास प्लिज writebits.com च्या फुटर वरील ई-मेल आयकॉन वर दाबून सबस्क्राईब करा