फुल जेव्हा फुललं
तेव्हा त्याला वाऱ्याने सुखावलं
पावसाने जगवलं
फुलपाखरू खेळलं त्याच्यासोबत
आणि सूर्यप्रकाशाने सांभाळलं
उन्मुक्त त्याच्या आयुष्यात
खूप काही कथा होत्या
आठवणी सजल्या
आणि कल्पना त्याला सुचल्या होत्या
पण हळू हळू त्याला वाटलं
हे सगळं व्यर्थ आहे
जगणं हे निरर्थक आहे
आणि मृत्यूच्या दिशेने
चालू लागली त्याची पावलं…
त्याला जाणवेल का
फांद्यांनी त्याला जपलंय
पानांनी त्याला सुखावलंय
आणि मुळांनी
घट्ट धरून ठेवलंय
त्यांचे प्रयत्न टिकतील का
फुल नव्याने जगेल का?