मावळतीला कसं वाटेल? आयुष्य संपण्याची खंत असेल की पूर्णत्वाची भावना? तारुण्याच्या आठवणींनी मन भरलेलं असेल की वृद्धत्वाच्या खुणांनी जर्जर झालेलं असेल…आधी सगळं कळलं असतं तर जगण्यातली मजा नष्ट झाली असती का? काहीच कळत नाही. वाळू सारखं भुर भुर उडणाऱ्या वेळेबरोबर वाहताना हे विचार सोडून द्यायचे…क्षण जगायचे…दुःख ही फक्त एक आठवण ठेवून….
