लग्नानंतर स्मिताचा ऑफिस जॉईन करण्याचा पहिला दिवस होता. आई वडिलांच्या मृत्यूनंतर अनेक वर्ष स्मिता एकटी राहिली होती. स्मिताने तयारी केली आणि तिला जाणवलं आपण ड्रेसच्या हातांच्या नाडीची फुलासारखी गाठच नाही बांधली. आता कसं करणार…. मग ती संकोचत नव्या नवऱ्याकडे गेली. “हे बांधून देता का प्लिज?” नवऱ्याने स्मित करून गाठी बांधल्या. आणि नव्या प्रेमाच्या फुललेल्या गाठीत दोघं जणं बांधली गेली.