माझं तुझ्यावर प्रेम आहे
हे मला पुरेसं होतं
पण तुझ्या अपेक्षांचं ओझं
मी वाहायचं कसं…
मी अलगद धरला हाथ
काहीच गणित न करता
तू म्हणालीस नाकी नउ येतील
इ एम आय भरता भरता
मी स्वछंद मोकळा पक्षी
तुझ्या प्रेमात बदललो
तुझ्यासाठी सगळं करावं
म्हणून जगात सावरलो
तुझं आपलं तेच तेच
या महिन्यात येतील पैसे किती
तुला प्रेमात आणि मला पैशात
काहीच नाही गती
आता फक्त देवच
आपल्याला सावरू शकतो
तू मला मी तुला
तेव्हाच समजू शकतो