कसा होतास रे तू?
आता आठवत पण नाही…
तुझं दिसणं तुझं असणं
तुझा आवाज तुझा स्पर्श
सगळं कसं पुसट झालंय…
तुझ्या हातात हात
तुझ्या मिठीत बेभान होणं
कधीतरी सर्वस्व होतं माझं…
तुझ्या स्वप्नांना अनुरूप
मी स्वप्न पाहणं
माझी एक सहज प्रवृत्ती होती…
कसा चढायचा उन्माद तुझ्या स्पर्शाने?
हा अनुभव नसून
प्रश्न होऊन राहिलाय फक्त
आणि ते प्रेम
त्याचा अंत्यसंस्कार होऊन
नदीत राख वाहून गेलीय कधीच
नदीत राख वाहून गेलीय कधीच…