उन्मुक्त वाऱ्यावर उडू पाहणाऱ्या
चंचल मनाला
बांधून ठेवतात स्वयंपाक घराच्या फोडणीत
आणि म्हणतात असच तर असतं आयुष्य…
ही कोण शहाणी माणसं आहेत
जी येईल तसं जगण्याला
म्हणतात पॉझिटिव्ह थिंकिंग
दिनाक्रमच्या चक्रात अडकूनही
ही आनंदी राहतात
कमाल आहे त्यांची
आणि माणसाला
मशीन बनवून म्हणतात
त्याला प्रगती