आता तरी सोड ते
मुळू मुळू रडणं
झालेल्या घटनेचा घासून घासून
पूर्ण कीस काढणं
आता तरी मुक्त कर
भूतकाळाच्या भुतांना
लटकून राहूदे त्यांना
इतिहासाच्या पानांना
जसा जुना गंज नको
तशीच नको स्वप्नांची ओझी
आवडतं काम करताना
फुलं व्हावी अस्तित्वाची
किती करशील हिशोब
कमी, जास्त, अजून राहीलं
मोकळा श्वास घेत राहा
आयुष्यात जरी काहीही पाहिलं
आता तरी दार उघडून
उगवत्या सूर्याकडे बघ
हलकं फुलक उडणाऱ्या
सावरीच्या कापसासारखं जग…
शीतल मुळीक
writebits.com