ओळखीची प्रेमळ नजर
वेळप्रसंगी दगड होते
आयुष्याच्या अर्थाची धमनी
तेव्हा तिथेच थिजून जाते…
Month: April 2023
कृती
विचार केला वाईट घटनेचा
तर वेगवेगळे फाटे फुटत जातील
अर्थांच्या जाळ्यांनी
मनाचे गाभारे घुसमटत राहतील
खोटेपणाच्या मागेही
खरं असत उभ
मुक्त होऊन सगळ्यातून
कृती करत राहशील
तरच जगत राहशील
भीती
जेव्हा स्पर्श करतात
नाजूक फुलपाखरं
आणि हळूवार फुलतात
स्वप्नांची फुल
तेव्हा आतल्या काळोखातून
खेचणाऱ्या भूतांमुळे
स्वतःचीच भीती वाटते