काहीतरी आहे आपल्यामध्ये
ज्यात आहे मोकळा श्वास
आणि निरभ्र अवकाश…
गाण्याची ओळ
स्वच्छ आंघोळ…
वाहणारं पाणी
बाळं गोजिरवाणी..
समुद्राची गाज
हिरवाकंच साज…
दिव्यत्वाचा शोध
मंत्र अबोध…
खूप काही आहे
पण बंधन कशाचच नाही
मोकळ्या पक्षासारखं मन
तुझ्याभोवती फिरत राही….
