घड्याळाचा गजर वाजला आणि रुहीचे डोळे सटकन उघडले. आजकाल ती अशीच उठायची. शॉक लागल्यासारखी. पण तिला बिछान्यातून बाहेर पडायला खूप कष्ट घ्यावे लागायचे. तेच ते आयुष्य, तीच ती सकाळ, तेच ते तिघांचे डबे बनवणं, तेच ते ऑफिस, तीच ती लोकल आणि बायकांची मचमच…, तेच ओंकारचा अभ्यास घेणं..तेच ते काम…. रोज तेच ते…तेच ते… बऱ्याच दिवस हे कंटाळलेपण तिला त्रास देत होतं… आयुष्य एक नीरस यंत्र बनलं होतं….
पण आज तिला अगदीच उठवेना.. बिछान्याने तिला जणू काही घट्ट धरून ठेवलं होतं… विक्रांत तीच्यानंतर एक तासाने उठायचा… तो झोपला होता… ती मानसिकरीत्या कोलमडून गेली होती.. कुठे सुट्टी घेऊन बाहेर जावं म्हटल तर जमा खर्चाचा ताळमेळ बसणार नव्हता.. ओंकार च पूर्ण शिक्षण बाकी होतं.. आता कुठे सातवीत गेला होता तो.. तिला मार्ग संपल्यासारख झालं… बराच वेळ असाच गेला..
तितक्यात तिचा फोन वाजला… एव्हढ्या सकाळी फोन… तिने टेबलवर ठेवलेला फोन घेतला.. फोन रीमाचा होता..
रीमा: “अग न्यूज बघते आहेस की नाही..”
रुही: “नाही ग काय झालं?”
रीमा: “अग आपली कंपनी बँक्रप्ट झालीय… बंद पडली..”
रूही ताडकन उठून बसली..
रूही:”अगं असं अचानक काय झालं?”
रीमा: “माहीत नाही पण आधीपासूनच गोंधळ होता म्हणे.. फक्त आपल्याला कळू दिलं नाही.. पॉलिसीज चां खप कमी होता एव्हढ तर ऐकून होतो ना”
रूही: “अगं जाऊन बघुया तरी..”
रीमा: “अग न्यूज सकाळीच आली होती.. बघ भट्टड सर, कोलते सर सगळे गेलेत आधी.. आपण जाऊन काय त्या गर्दीत करायचं… टी व्ही लाव मग कळेल..”
रूही ने बाय करून फोन ठेवला आणि टी व्हीं लावली.. या गडबडीने विक्रांत उठला..
विक्रांत: “काय झालं गं?”
रूही काळजीत बुडून टी व्हि बघत होती
रूही: “बघ ना माझी कंपनी बंद पडली…”
विक्रांत: “काय????”
रूही: “बघ ना तेच दाखवत आहेत.”
विक्रांतने एक उसासा सोडला..
विक्रांत:”तू नको काळजी करू.. दुसरी नोकरी मिळेल.. तोपर्यंत मी आहे ना.”
रूही: “या वयात या स्किल ने मी कुठे नोकरी शोधायला जाऊ?..”
विक्रांत: “अगं चाळिशी पण नाही झाली तुझी.. काय बोलतेस…”
रूही: “अरे मला अजिबात कॉन्फिडन्स नाहीय.”
विक्रांत:”अगं आपल्या हातात दुसरं काही आहे का?…….तू शांत हो.. मी आज बाहेर जेवतो काही बनवू नकोस आणि ओंकार पण कॅन्टीन च खाईल.. नाश्त्यासाठी ब्रेड आणतो मी..”
रूही: “मी असं बसून काय करू…”
विक्रांत:”आजच्या दिवस फक्त आराम कर संध्याकाळी बोलू.”….
रूही विचारात बुडून हळू हळू कामं आवरायला लागली.. दुपारचा एक वाजत आला तरी तिला भूक नव्हती… पण जगणं तर सोडू शकत नाही ना.. तिने जेवण मागवयला फोन हातात घेतला आणि तिचं मन अडखळलं..
‘हे असे खर्च पुढे झेपणार का आपल्याला… काय होईल पुढे…’
हे आणि असेच विचार करत तिने जेवण मागवल..
जेवण आल आणि ती जेवत असतानाच फोन वाजला..
“हॅलो.. हा विक्रांत बोल….. काय!!!! अरे तू वेडा आहेस का… अरे पण तू रागावर कंट्रोल ठेवायचा ना.. आधीच माझी नोकरी गेलीय विक्रांत तुला कळत कसं नाही… अरे कसं सगळ होईल नीट.. मला आता कळतंच नाहीय काही..”
तिने फोन ठेवला आणि तिला रडूच फुटल.. विक्रांत बॉस बरोबर भांडून नोकरी सोडू शकतो हे तिला खरंच वाटेना.. तिच्या घशाखाली घास उतरेना तिने जेवण तसच स्वयंपाक घरात नेऊन ठेवलं आणि डोकं धरून बसली.. बसल्या बसल्या तिला झोप लागली आणि उठली तेव्हा संध्याकाळचे चार वाजले होते.. उठल्या उठल्या तिला एकदम भयंकर वाटत होत.. जे आज झालं ते स्वप्न हवं होत असं तिला प्रकर्षाने वाटल आणि फोन वाजला.. ती थोडीशी दचकलीच.. तिने फोन उचलला.. “काय … कुठे.. अरे बापरे..” तिने फोन ठेवला आणि विक्रंतला तातडीने फोन केला.. तिला ओक्साबोक्शी रडू फूटल होत. विक्रांत अरे ओंकारच ॲक्सिडंट झालंय.. रहेजा मध्ये घेऊन गेलीय त्याला टीचर.. हो मी निघतेच.”
आणि ती घाईघाईतच निघाली..
हॉस्पिटलमध्ये विक्रांत आणि ती एकदमच पोचले.. ओंकार आय सी यू मध्ये होता.. त्यांनी त्याला बाहेरूनच बघितलं आणि डॉक्टरांना भेटले..
डॉक्टर:”मार मेंदूला लागलाय आणि थोडी क्रिटिकल सिच्युएशन निर्माण झालीय.. उपचार चालू आहेत.. चोवीस तास अंडर ऑब्जरवेशन खाली ठेवूनच काय ते सांगता येईल.. तुम्ही थांबून तसा काही उपयोग नाहीय आता.. घरी जा.. आम्ही इथे सगळी काळजी घेतोय.. “
विक्रांत आणि रूही हॉस्पिटल च्या बेंचवर मूकपणे बसून राहिले… असाच कितीतरी वेळ निघून गेला… कुणीच काही बोलेना.. रात्रीचे नऊ वाजले आणि विक्रांत रूहीला म्हणाला “चल जाऊ..”
दोघे घरी आले आणि त्रासून थकून झोपून गेले…………….
दुसऱ्या दिवशी सहा चा गजर वाजला आणि रूही गडबडीत जागी झाली.. आज विक्रांत तिच्याबरोबरच उठला आणि रुहीला म्हणाला
“आज माझी महत्त्वाची मीटिंग आहे.. मी तुला काल सांगायला विसरलो.. “
रूहीला काहीच कळेना…जे काल झालं ते काल होता की स्वप्न होत… की विक्रांत विसरून गेला त्याची नोकरी गेलीय… पण ती स्वतःच संभ्रमात होती.. म्हणून गप्पच राहिली.. तितक्यात फोन वर एस एम एस आला… तो रिमाचा होता.. ‘आज साडी नेसून ये कंटाळा करू नकोस.’
म्हणजे माझी पण नोकरी आहे की.. तितक्यात ओंकार डोळे चोळत चोळत बाहेर आला आणि त्याने रूहीच्यां बाजूला थोडीशी जागा होती त्यात येऊन झोपला.. रूही पूर्ण गोंधळून गेली होती.. स्वप्न तर नक्कीच नव्हत मग होत काय???
या प्रश्नाचं उत्तर कधी मिळणार होत का माहित नाही.. पण आयुष्याची गाडी पूर्णपणे रुळावर होती.. तिला एकदम हायसं आणि प्रसन्न वाटलं.. खुशितच ती स्वयंपाक घरात गेली आणि गाणं गुणगुणत आवरू लागली.. विक्रांत तितक्यात आत आला
“आज कपाळावर आठ्या तर नाहीत आणि चक्क गाणं बिण..”
रूही हसत म्हणाली: “तुला सांगू तर शकत नाही काही मी.. पण मला खूप आनंद वाटतो की आपल आयुष्य एक रूटीन आहे..”
विक्रांत: “क्या बात है.. आज एकदाचा सूर्य पश्चिमेला उगवला..”
रूहीने त्याला एक प्रेमाची चापट मारली आणि दोघं हसायला लागले…