बोलला एकदा एकांत…
दुःखच भरलंय माझ्या उरी
आयुष्य आहे माझं
फार एकसुरी
मी आणि आनंद यामध्ये
खोलच खोल दरी…
एकांताशी बोलताना
झडल्या पावसाच्या सरी….
मी त्याला म्हणाले
गोष्ट आहे खरी
सोबत कुणी नाही
भावना फार बोचरी!
पण नेहमीच अशी सोबत
कुठे असते साजरी?
दुःख पोचतच कसंही
प्रत्येकाच्या घरी…
विचार कर
तर्क वापर
खरे खरे डोळे उघड
करण्यासारखं खूप आहे
प्रत्येकाच्या आयुष्याचं
वेगळच असं रूप आहे…
जाणवेल जेव्हा मनापासून
ही गोष्ट खरीखुरी
तेव्हा तुला वाटेल
आयुष्य आहे खरं तर
सुरेख तलम जरतारी!!!
writebits.com