झकास कपडे घालून
ओठांना लिपस्टिक लावून
ती ग्रुप वर फोटो टाकते
ती फॅब दिसते
मुलांचा रोज अभ्यास घेऊन
त्यांच्यात गुण सकारात्मकता पेरून
त्यांना कशातही मिळालेलं बक्षीस
ती पोज सकट ग्रुप वर टाकते
ती फॅब दिसते
वेळात वेळ काढून
किचन मध्ये राहून
ती वेगवेगळ्या रेसिपी
ट्राय करत राहाते
ती फॅब दिसते
आणि एव्हढं सगळं करून
ती सुट्टीच्या दिवशी
मला येऊन भेटते
गुजगोष्टी गप्पांची
बहार उडून जाते
तासंतास माझे
सुगंध बनवून टाकते
तेव्हा तर ती माझी म्हणून
खूपच फॅब दिसते!!!!!