कळ काढून
हैराण करून ठेवायचास
तरी वाटतं दादा तू असायला पाहिजे होतास
आठवतं माझ्यासाठी
रडला होतास तू
पिंकू पिंकू करत
मनाला भिडला होतास तू
तेव्हढच प्रेम करणारी ताई आहे
पण तू जवळ राहून
काळजी घेणार होतास
वाटतं दादा तू असायला पाहिजे होतास
मी चिडले की
माघार घेणारा तू
काहीही झालं तरी
हसून मस्करी करणारा तू
काही झालं तरी
तुझ्यासारखा तूच होतास
दादा तू असायला पाहिजे होतास
माझी काळजी घेतलीस भरभरून
ज्ञान दिलस मन लावून
शेवटी लांब गेलास
तरीपण पुरून उरला होतास
दादा तू असायला पाहिजे होतास