आज कविता नाही सुचली तरी चालेल…
पण थंड वाऱ्याने मनाला
असंच भिडलं पाहिजे
सूर्य भेटला पाहिजे असाच
रोज सकाळी कडकडून
पक्ष्यांच्या किलबिलाटाने
जीवनाचं गाणं झालं पाहिजे
जी माणसं विचार करतात आपला
त्यांच्यासाठी उपकृत होता आलं पाहिजे
जे आहे ते साठवून
उत्सव साजरा करता आला पाहीजे
आयुष्यातल्या छान आठवणींचा
जल्लोष उडाला पाहिजे
आज कविता नाही सुचली तरी चालेल…
पण जीवंत होता आलं पाहिजे!!!