शुभ दिन यालाच म्हणतात !
सुगंधी उटण्याने स्वच्छ न्हाऊन
जुनं आयुष्यं धुवून टाकायचं
उडवायचे दुख्खाचे बार
फुलणाऱ्या पावसाने उल्हासीत व्हायचं
पेटवून उडवून साऱ्या काळज्या
नष्ट करायची त्यांची चिन्हं
येणाऱ्या आयुष्याच्या स्वागताला
रंगभरी रांगोळी दारात काढायची
पणत्या पेटवून आपलीच नाही
दुसऱ्यांची मनही उजळून टाकायची
कंदील लावून आपल्या दारी
येणाऱ्या जाणाऱ्या वाट दाखवायची
एकत्र जमायचं वाटायचा फराळ
सुखाला सुख देउन सुखं वाढवायची
प्रफुल्ल आनंद उत्साह जीवनी
आयुष्यभर फक्त दिवाळीच जगायची !