फुल जेव्हा फुललं
तेव्हा त्याला वाऱ्याने सुखावलं
पावसाने जगवलं
फुलपाखरू खेळलं त्याच्यासोबत
आणि सूर्यप्रकाशाने सांभाळलं
उन्मुक्त त्याच्या आयुष्यात
खूप काही कथा होत्या
आठवणी सजल्या
आणि कल्पना त्याला सुचल्या होत्या
पण हळू हळू त्याला वाटलं
हे सगळं व्यर्थ आहे
जगणं हे निरर्थक आहे
म्हणून त्याने शोध घेतला…
त्याला जाणवलं…
फांद्यांनी त्याला जपलंय
पानांनी त्याला सुखावलंय
आणि मुळांनी
घट्ट धरून ठेवलंय
कोणीतरी अद्भुत शक्ती
त्याच्या अस्तित्वातून
अर्थ घडवतेय
मग त्याला वाटलं
मनसोक्त जगायचं
अदृश्य पंखानी
भरारी घेऊन
सगळं विश्व व्यापायचं !!!!
