
क्रूर सुख मिळत!
कुणाच्या दुःखापेक्षा
आपल दुःख छोट वाटत..
पण क्वचितच
आपल तसं काही नसूनही
दुसऱ्याचं दुःख
कणा कणातून अनुभवल जातं
ते डोळ्यांतून उगा आसव गळण्याचे
समाधी चे क्षण
अद्वैताची साक्ष आहेत..
तीच आहे मुक्ती
स्व मधून
आणि तोच आहे मोक्ष
कारण त्यात स्वतःच दुःख नाही
स्वतःच्या अस्तित्वाची जाणीवही नाही!!!