कधी कधी
नाही जुळू शकत दोन टोकं
नशिबाच्या भाळावर असतात
परिस्थितीची भोकं !!
Category: Marathi Poems
तेव्हाच खरं जगतो
गाण्यात धुंद होतो
प्रेमात बुडतो
गप्पांमध्ये रंगतो
निसर्गात रमतो
माणूस स्वतःला विसरतो
तेव्हाच खरं जगतो
वारा पांघरून
कुठे सतत वेड्यासारखं
स्वप्नांमागे धावणं
कधीतरी हवं वारा पांघरून
गवतावरती झोपणं
वाळू
किती अर्थ द्यायचा
किती अर्थपूर्ण जगायचं
वाळूसारख सहजच
का नाही निसटून जायचं!!!
एकांत
एकांतात मी
स्वतःसोबत असणं
एक मधूर संगीत आहे..
स्वतः स्वतःसाठी
रचलेल्या आयुष्याचं
अप्रतिम गीत आहे!
प्रेम
अचानक या डोळ्यात अश्रूंचा येतो पूर!
प्रेमाने ओतप्रोत भरून येतो उर…
प्रेम नकोच असं ज्यात नाही उणी दुणी
व्यवहारी या जगात कुणाचं नाही कुणी.
प्रेम
कोण कुणाचं काय लागत
सगळ खरंच फेल असतं
तीच नाती खरी
ज्यांचं नाव प्रेम असतं
काही फरक पडत नाही
काही फरक पडत नाही
काही असण्याने काही नसण्याने
आयुष्य पूर्ण सजत
स्वतः स्वतःचा मित्र असण्याने