आपण माणूस असतो अन
परिस्थितीचे बंधही असतात
पण विश्वास ठेवला देवावर
की बिघडल्या घटना सुद्धा सजतात …
Category: Marathi Poems
माणूस
उगाच वाईट करू नये
माणुसकीला जागावं
चांगली कामं करण्यासाठीच
माणूस म्हणून जगावं
ताई
अजूनही आनंद होतो
तिला अचानक पाहून
थोड्याशा विसाव्याला
हक्काची कूस मिळते
कीतीही मोठं झाले
केस पिकले तरीही
जीवाला जीव देणारी
ताई ही ताईच असते
कल्पनेचा पक्षी
उडूदे कल्पनेचा पक्षी
मुक्तपणे नभात
राहू नये थोडेही
परिस्थितीचे बंध मनात!
बाते
बाते बस बाते होती है
उन्हे कभी दिल से न लेना
पीछे हटती लहरों की तरह
उनको पलभर है रहना…
मोकळं
फक्त मोकळं आकाश हवं
मुक्त कल्पनांचा श्वास हवा
हिरव्या गर्द बहराचा
नित्य नवा सहवास हवा……
किती पैशात मिळेल सांगा
नवीन स्वप्न
नको देऊस जाचक आठवणींना थारा
शेवटचा अश्रू पुसून टाक
अस्तित्वाच्या प्रत्येक कणाला
नवीन स्वप्नांनी भरून टाक!!!
निर्णय
जे काही घडत आहे मनात
तेही नसतो आपण
आपण असतो
खोल जाणिवेतून येणारा
अभेद्य अस्तित्व असलेला
अंतिम निर्णय!