Marathi Short Stories

निवड

लग्नाचं वय! लग्नाचं वय! ऐकून साक्षी वैतागली होती.. पण वेळेत सगळ उरकलं पाहिजे हेही तिला कळत होतं. करिअर तर पुढे पुढे आव्हानं देतच राहातं.. शेवटी साक्षीने स्थळं पहायचं ठरवल.
आई: “सातार्डेकर एकदम विश्वासू आहेत. त्यांनी पूर्ण विचार करूनच हे स्थळ आणलं असणार. पहिलंच स्थळ आहे अजून पाहू असं म्हणून उगाच पुढे ढकलू नकोस.”
साक्षी:”हो ग आई… तू तयारी कर आधी पटापट.. उशीर झाला तर इम्प्रेशन वाईट पडेल.”
आई: “हा काय तुझ्या नोकरीचा इंटरव्ह्यू आहे इम्प्रेशन वाईट पडायला…”

आई आणि साक्षी कार ने निघाले आणि रेस्टॉरंट मध्ये वेळेत पोहोचले. सुमित आणि सुमितचे आई बाबा अगदी वेळे आधी येऊन रेस्टॉरंट मध्ये बसले होते. साक्षीला पाहून सुमितचा चेहरा खुलला..  पण सुमित मध्ये पाहताक्षणी छाप पडावी असं काहीच नव्हतं… दिसणं हे काही सक्षीच लग्नाचं प्रमाण नव्हतं.. म्हणून तिने त्याला बाद केलं नाही.. 
इकडची तिकडची बोलणी झाली. मुला मुलीला वेगळ बोलू द्यावं अस सुमितच्या आईच मत पडलं… मग त्या दोघांना बाहेर फिरून येऊ द्या असा विचार मांडण्यात आला आणि त्याला साक्षी तयार झाली.
सुमित: “माझी ऑफिसची मीटिंग आहे आठ वाजताची.. तुमची हरकत नसेल तर आपण उद्या भेटूया..”
साक्षी: “पण शनिवारी तुम्हाला सुट्टी असते ना.”
सुमित: “सध्या एक महत्त्वाचा प्रोजेक्ट येतोय तर थोड जास्त काम आहे.”
साक्षीच्या मनात पाल चुकचुकली.. हा वर्काहॉलीक आहे की काय. आताच असं बोलतोय तर नंतर मला वेळ देईल काय…

दुसऱ्या दिवशी सुमित आणि साक्षी बागेमध्ये भेटले.
साक्षी: “तुम्हाला काम खूप आवडत वाटत.”
सुमित: “तसं नाही पण काम केलं की त्यातल्या सगळ्या आव्हानांची मजा घेता आली पाहिजे. नाहीतर आयुष्य नीरस होईल.”
साक्षीला पटत..
सुमित: “तुम्हाला छंद जोपासायला वेळ मिळतो का?”
साक्षी: “आमचा टेरेस फ्लॅट आहे तर मला झाडं लावून त्यांची काळजी घ्यायला खूप आवडत..”
सुमित: “ओह.. काय योगायोग आहे. मलाही झाडांची काळजी घ्यायला खूप आवडत. आमच्या रो हाऊसच्या भोवती मोठी झाड पण लावलीत मी.. चिकू पेरू वगैरे..”
साक्षी: “काय म्हणता मग तर खूप मजा येईल”
सुमितने चमकून तिच्या कडे बघितलं आणि मिश्किल चेहरा करून विचारलं..
सुमित: “हा तुमचा होकार समजू का मी?”
साक्षी लाजली. आणि विषय बदलण्यासाठी म्हणाली
“अजून काय छंद आहेत तुमचे?”
सुमित: “वाचन! आता फार वेळ मिळत नाही पण पूर्वी मी खूप वाचायचो”
साक्षी: “कशा प्रकारचं वाचता तुम्ही”
सुमित: “मला काल्पनिक आणि माहितीपूर्ण असं दोन्ही वाचायला आवडतं.”
साक्षी: “मग सध्या काय वाचलं किंवा वाचताय?”
सुमित: “सृष्टीची रचना देवाने केली की उत्क्रांतीतून झाली याचा उहापोह करणारं एक पुस्तक आहे.”
साक्षी: “अरे वा! काय म्हटलंय मग त्यात?”
सुमित बोलत राहिला आणि साक्षी ऐकत राहिली.. मनाचे धागे एकमेकांत गुंफून एक सुंदर नक्षी बनू लागली..

दुसऱ्या दिवशी साक्षी प्रसन्न मनःस्थितीत उठली आणि तिला असं वाटून राहीलं की ही प्रेमाची जादू आहे का? …….

ऑफिस मध्ये तिचा नवीन मदतनीस येणार होता आज. तिला तिच्या सगळ्या कामाची रूपरेषा त्याला द्यायची होती. साक्षी ऑफिसमध्ये वेळेत पोहोचली आणि रिसेप्शन मध्ये एक खूप देखणा मुलगा बसलेला पहिला… साक्षीला पाहताच तो उठून उभा राहिला.
अद्वैत: “हॅलो साक्षी मॅडम!”
साक्षी: “ओह तुम्ही अद्वैत सावंत का?”
अद्वैत: “हो. गुलाम आपकी सेवा मे हाजिर है!”
साक्षीला पटकन हसू आलं…
साक्षी: “ओळखी करण्यात पटाईत दिसता तुम्ही…”
अद्वैत: “अजून खूप गोष्टीत पटाईत आहे.. आप आजमाके तो देखिये..”
साक्षी पुन्हा हसली
साक्षी:”तुम्ही मला ओळखलं कस?”
अद्वैत: “साक्षी मॅडम सुंदर आहेत असं म्हटल होत मला कुणीतरी..”
साक्षी परत हसली
साक्षी:”आशा करते तुम्ही बोलण्यात आहात तसेच कामात पण हुशार असाल.”
अद्वैत: “आशा नाही ऑर्डर.. तुम्ही ऑर्डर करायची आणि आम्ही ती चांगल्या प्रकारे पूर्ण करणार. बघालच तुम्ही”
साक्षीने दिवसभर अद्वैतला ट्रेनिंग दिलं.. पण दिवसाच्या शेवटीही ती टवटवीत फुलासारखी खुललेली होती.. आज ती जितकी हसली तेव्हढी ती कधीच हसली नव्हती….

दुसऱ्या दिवशी कसलंस स्वप्न बघत साक्षी उठली.. तिच्या अस्पष्ट जागृतीवर कुठलासा अस्पष्ट चेहरा येत होता… आणि थोड्याच वेळात तो चेहरा स्पष्ट झाला… अद्वैत… अद्वैत हात पसरून तिला मिठीत बोलावत होता आणि साक्षी ताडकन उठली.. तिला आठवल तिने सुमितकडे  वेळ मागितला होता की आपण एकमेकांना अजून ओळखुया.. लग्नाची घाई आणि ओझं वाटायला नको… ती संध्याकाळी सुमितला भेटणार होती… आणि तिला मेल्याहून मेल्यासारख झालं.. अद्वैतचा चेहरा असा का शिरू पाहतोय माझ्या मनात…
पूर्ण वाचा

Marathi Short Stories

रूटीन

घड्याळाचा गजर वाजला आणि रुहीचे डोळे सटकन उघडले. आजकाल ती अशीच उठायची. शॉक लागल्यासारखी. पण तिला बिछान्यातून बाहेर पडायला खूप कष्ट घ्यावे लागायचे. तेच ते आयुष्य, तीच ती सकाळ, तेच ते तिघांचे डबे बनवणं, तेच ते ऑफिस, तीच ती लोकल आणि बायकांची मचमच…, तेच ओंकारचा अभ्यास घेणं..तेच ते काम…. रोज तेच ते…तेच ते… बऱ्याच दिवस हे कंटाळलेपण तिला त्रास देत होतं… आयुष्य एक नीरस यंत्र बनलं होतं….
पण आज तिला अगदीच उठवेना.. बिछान्याने तिला जणू काही घट्ट धरून ठेवलं होतं… विक्रांत तीच्यानंतर एक तासाने उठायचा… तो झोपला होता… ती मानसिकरीत्या कोलमडून गेली होती.. कुठे सुट्टी घेऊन बाहेर जावं म्हटल तर जमा खर्चाचा ताळमेळ बसणार नव्हता.. ओंकार च पूर्ण शिक्षण बाकी होतं.. आता कुठे सातवीत गेला होता तो.. तिला मार्ग संपल्यासारख झालं… बराच वेळ असाच गेला..
तितक्यात तिचा फोन वाजला… एव्हढ्या सकाळी फोन… तिने टेबलवर ठेवलेला फोन घेतला.. फोन रीमाचा होता..
रीमा: “अग न्यूज बघते आहेस की नाही..”
रुही: “नाही ग काय झालं?”
रीमा: “अग आपली कंपनी बँक्रप्ट झालीय… बंद पडली..”
रूही ताडकन उठून बसली..
रूही:”अगं असं अचानक काय झालं?”
रीमा: “माहीत नाही पण आधीपासूनच गोंधळ होता म्हणे.. फक्त आपल्याला कळू दिलं नाही.. पॉलिसीज चां खप कमी होता एव्हढ तर ऐकून होतो ना”
रूही: “अगं जाऊन बघुया तरी..”
पूर्ण वाचा

Marathi Short Stories, Uncategorized

मनाच्या भोवताली

नम्रताने, संदीपने भेट दिलेली साडी नेसली. नम्रताची सौंदर्य दृष्टीच चांगली होती. त्यामुळे तिचा ड्रेसिंग सेन्स, मेक अप सगळंच उत्तम असायचं. ती बऱ्याचदा संदीपला विचारायची, “मी मनाने अशीच असते पण दिसायला सुंदर नसते तर तू माझ्यावर प्रेम केलंच नसतं ना?” संदीपने याचं उत्तर कधीच नीट दिलं नव्हतं. तो मस्करीत तिला टाळत असे.
संदीप: “तू काय स्वतःला फार सुंदर समजतेस…”
नम्रता: “फार नाही पण आहेच ना?.. ”
संदीप चिडवल्यासारख हसतो..
नम्रता: “देईन फटका.. विद्रूप तर नाहीय ना?”
संदीप: “विद्रुपच आहेस म्हणून मी पसंत केलं…”
नम्रता: “हो हो… आला मोठा!”

नम्रता आणि संदीप नविन झालेल्या लाइट्स अँड साऊंड्स रेस्टॉरंट मध्ये निघाले. गाडीतून जाताना संदीप सतत फोन वर होता. आजकाल असच असायचं…संदीप सतत फोन वर.. भारावल्या सारखा तो यशाच्या मागे लागला होता… नम्रताचं आयुष्य म्हणजे फक्त संदीप आणि  तिचे काही छंद… नम्रतासाठी संदीप बरोबरचा क्वालिटी टाइम फार महत्त्वाचा होता. संदीप कॉलेज मध्ये अभ्यासात फार हुशार नव्हता. पण त्याची नाती जपायची आणि जोपासायची गोड सवय नम्रतला भुरळ पाडून गेली होती. नम्रताला आजकाल संदीप कडे बघताना कुणी परकाच माणूस दिसत असे… पण तिला समजत होतं संदीप रमलाय… त्याला कामात स्वतःला झोकून देणं… यशाच्या पायऱ्या चढत जाणं आवडत होतं.
पण आज प्रोमोशन च सेलिब्रेशन फक्त तिच्याबरोबर साजरं करायचं ठरवलं होत त्याने… मग हा वेळ तरी त्याने इतरांना.. कामांना विसरावं असं वाटत होत तिला..
पूर्ण वाचा

Marathi Short Stories

एक दिवस

गजराच्या आवाजाने निमिता उठली. बघते तर घड्याळात फक्त ५ वाजले होते.
‘असा कसा ६ चा गजर ५ ला वाजला?’
आणि तिने गजर बंद केला. खिडकीच्या बाहेरही अंधार होता.
‘एक तास झोपू शकतो आपण. नाहीतरी रात्रभर कुठे झोप आली. बॉस ने काय अपमान केला सगळ्यांसमोर… तेव्हापासून झोपच आली नाहीय ना नीट. पहिल्या रात्री तर रात्रभर टक्क जागी होते. भूकही लागतेय अस वाटत नाहीय तेव्हापासून. रूटीन चालवायचं फक्त आपलं. आईला कळायला नको. तिने आयुष्यातली सगळी आव्हानं समर्थपणे पेलली. तिला वाटेल काय ही आपली मुलगी. साधं ऑफिसचं काम नीट जमत नाहीय. लागल्यापासून ओरडा खातेय. स्वतःवरचा विश्वास हळू हळू संपूनच जाईल की काय असं वाटतय…..
……….
अरे विचार करता करता ६ वाजले..
पूर्ण वाचा

Marathi Short Stories

सोफा

फोनच्या एस एम एस ची रिंग वाजली. कामात व्यग्र असलेल्या मनिषाने लॅपटॉप च्या स्क्रिन वरचं लक्ष न हटवता फोन उचलला आणि पटकन बघूया असं ठरवत एस एम एस वाचला. “अरे !!!” आणि तिचा चेहरा आनंदाने उजळला… ती उत्साहात उठली… पण सभोवती बघितल्यावर तिला जाणवलं, इथे ऑफिसमध्ये कुणाबरोबर हा आनंद वाटणार!!! आणि ती खाली बसली. पुन्हा एकदा एस एम एस वाचून ती समाधानाने हसली आणि तिला कुठेतरी वाचलेलं आठवलं. ‘जगातले सगळ्यात सुंदर शब्द “आय लव्ह यु” नसून “सॅलरी क्रेडीटेड” हे आहेत’…
पूर्ण वाचा

Marathi Short Stories

वायरल

निशांत संकेतच्या घरात त्याच्या बाजूला बसून एडिटिंग कसं होतंय ते बघत होता. पण त्याचं पूर्ण लक्ष त्यात नव्हतं. तो सारखा मोबाईल तपासत होता. लातूरच्या अप्रतिम अज्ञात गायकावरचा लेटेस्ट व्हिडीओ टाकला होता ‘अन्नोन वाईब्स’ या त्यांच्या यूट्यूब चॅनेल वर, त्याच्या ग्रुपने. निशांत सारखा व्ह्यूज आणि लाईक्स बघत होता. पण या वेळीही हवा तेवढा प्रतिसाद नव्हता. हजार लाईक्स होतील म्हणून त्याचा ग्रुप कधीपासून वाट बघत होता. पण एव्हढे छान मनोरंजक व्हिडीओज टाकूनही ग्रुपमध्ये एकूण असलेल्या तिघांपैकी कोणाचेच ओळखीचे फॉरवर्ड करत नव्हते बहुतेक. हळू हळू सब्सक्रायबर्स वाढतील म्हणून एक वर्ष वाट बघून निशांत थकला होता. एक वर्षात सगळे नोकरीला लागले होते. स्वतःचा पैसा टाकून तिघे मित्र व्हिडीओज बनवत होते. एखादातरी व्हिडीओ वायरल जावा. पण नाहीच…
पूर्ण वाचा

Marathi Short Stories

पाणी

पाऊस तर थांबतच नव्हता. तिसऱ्या मजल्यावरच्या सक्सेनांकडे राऊतांच कुटुंब येऊन थांबलं होतं. चौपाटीजवळ कौतुकाने घेतलेलं घर, अतिशय विचार करून साकारलेलं इंटिरिअर… ते पण याच वर्षी. सौ राउतच नाही तर श्री राऊतांच्या मनातसुद्धा हेच विचार चालले होते. फक्त पूर्ण कुटुंबाने धीर सोडू नये म्हणून ते भीती आणि त्रास चेहऱ्यावर येऊ देत नव्हते. पाणी घरात शिरलं आणि शक्य तेव्हढं महत्वाचं सामान घेऊन नवरा बायको व त्यांचा एक मुलगा एक मुलगी असं चौकोनी कुटुंब सक्सेनांच्या घरात आलं. पण पाऊस तर अविरत चालला होता… सगळेच शांत बसले होते आणि सौ सक्सेना स्वयंपाकघरातून आल्या.
सौ सक्सेना: “खाना लगाया है। खा लेते है।”
पूर्ण वाचा

Marathi Short Stories

समज – गैरसमज

निळकंठ निकम, वय ७५ वर्ष, उत्साही, आणि वयाच्या मानाने दिसायला तरुण! खूप कौतुक व्हायचं त्यांचं त्यांची ठणठणीत तब्बेत बघून. त्यात मोकळा बोलका स्वभाव. जिथे जायचे तिथे मैफिल रंगवायचे. आजही ते नेहमीच्याच उत्साहात ठाण्याच्या त्यांच्या हृदय विकार तज्ञांना भेटून आले होते. त्यांनी दारावरची बेल वाजवली आणि त्यांच्या सुनेने नम्रताने दार उघडलं.
निळकंठ निकम: “एकदम ठणठणीत आहे मी….
पूर्ण वाचा