Satirical Marathi Articles

काही समानअर्थी शब्द

समानअर्थी शब्द शीर्षक वाचून “दारू” “मदिरा”, “अग्नी” “आग”, “माणूस” “मानव” असे अनेक शब्द तुमच्या मनात आले असतील. पण मी या सामानअर्थी शब्दांबद्दल नाहीच बोलत आहे मुळी. मी त्या शब्दांबद्दल बोलतेय जे स्थलकालपरत्वे समान रूप धारण करतात. “बिचारा किती ‘साधा भोळा’ आहे रे” असं आपण बोलतो. पण त्याच माणसाने आपल्या कामात गल्लत केली कि “‘बावळट’ लेकाचा जराही हुशारी नाही!” असं बिनधास्त बोलतो आपण.

Satirical Marathi Articles

इकडे रेप तिकडे रेप, रेप रेप चोहीकडे!!!

तसं माझ्यावर कुणी रेप करेल की नाही अशी शंकाच आहे, तरीही आपलं ट्रेंड म्हणून जाता जाता बरी पोरगी नाही दिसली म्हणून माझ्यावरच रेप करून कुणी जाऊ नये म्हणून फार सावध रहाते मी. पण मी विचार केला कलियुगाचा पीक काय असेल?…….

Satirical Marathi Articles

आगया है देखो बॉडीगार्ड

अरे ओह “हिट अँड रन” केस हुआ ना.. उसका व्हिलन कौन है रे? तेरी तो! आगया है देखो बॉडीगार्ड… हो त्याचा बॉडीगार्ड रवींद्र पाटीलच म्हणाला होता कि सलमान दारूच्या नशेत गाडी चालवत होता.

Satirical Marathi Articles

कांदेपोहे

आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोहे… हे गाणं ऐकलं तेव्हा वाटलं उगाचच हां…  अतिशयोक्ती! पण प्रत्यक्ष लग्नाच्या आखाड्यात पाय ठेवले तेव्हा फोडणीत ढवळून निघणं म्हणजे काय याची प्रचिती आली.

पहिला मुलगा बघायला आला तेव्हा मी नेहमीसारखी हसत बाहेर आले आणि सगळ्यांकडे बघत बसले. मुलाकडच्यांनी प्रश्न विचारले तेव्हा मीही काही प्रश्न विचारले. हिला आधीच ट्रेनिंग द्यायला पाहिजे होत अशा अविर्भावात सगळे माझ्याकडे बघत राहिले. आणि मी अजाण बालक! पाहुणे निघून गेले आणि मुलाकडच्यांसमोर आलीस कि इंटरव्ह्यू द्यायला म्हणत सगळ्यांनी माझी खरडपट्टी काढली. मुलगी थोडी फॉरवर्ड आहे असं म्हणत मुलाकडच्यांचा नकार आला.

पूर्ण वाचा