ओळखीची प्रेमळ नजर
वेळप्रसंगी दगड होते
आयुष्याच्या अर्थाची धमनी
तेव्हा तिथेच थिजून जाते…
कृती
विचार केला वाईट घटनेचा
तर वेगवेगळे फाटे फुटत जातील
अर्थांच्या जाळ्यांनी
मनाचे गाभारे घुसमटत राहतील
खोटेपणाच्या मागेही
खरं असत उभ
मुक्त होऊन सगळ्यातून
कृती करत राहशील
तरच जगत राहशील
भीती
जेव्हा स्पर्श करतात
नाजूक फुलपाखरं
आणि हळूवार फुलतात
स्वप्नांची फुल
तेव्हा आतल्या काळोखातून
खेचणाऱ्या भूतांमुळे
स्वतःचीच भीती वाटते
जनाब
दुनिया की सितम से क्यों बदले?
हम हिसाब नही कर रहे जनाब
हम तो जी रहे है!!!!
हवं तसं
करायचं ते करायचं
जगायचं तसं जगायचं
आयुष्यच तर आहे…
आपल्याला हवं तसं
त्याच्याकडे बघायचं!!!
झळाळी
जाणवतय का तुला
ती दुःखाची धीर गंभीर तान
खोल गर्तेतून येणारी
ती सोनेरी कडा आहे
आनंदाला झळाळी देणारी…
वळण
त्या वळणावर आले
तेव्हाच जाणवल होत
आता अश्रूंचा पाऊस पडणार
खूपशा कविता झडणार
माझं मन माझ्याशीच लढणार
दुःखाने jam-packed
दिवस आणि रात्र असा
यातून पण आनंदात यायला शिकवणारा
Power-packed अनुभव घडणार
सुहाना
कांटोभरे रास्ते
अंधियारी सी मंजिले
पर आदत इतनी है
के सफर तो सुहाना ही होगा !!!
