आपण नेहमीच योग्य असतो
सतत पटवून सांगतो!
पण वेगळ काही वागून पाहू
हे न जाणवल्याने
नात्याचा सुखद प्रवास
तिथेच पूर्ण थांबतो…
Tag: kavita
वेळ
आपण फक्त मोकळं सोडायचं
जखडलेल्या मनाला
मग हतबल अडचणी
स्वतःच स्वतःला सोडवत जातात
वेळेचा खंबीर हात पकडून !!!
अद्भुत प्रेम
नसावं त्यागाचं ओझं
कुणावर कुणाचं
असावं असं अद्भुत प्रेम
की दुसऱ्यासाठी बदलण्यात
मन रमावं दोघांच
मनोरा
मेंदू म्हणतो
तोड भावनांचे वेडे मनोरे
फसव्या मनाचे
खोटेच खेळ सारे
पूर्ण वाचा
अद्वैत
जखमांची फुलं बनवायची अद्भुत कला
थोडी जमलीय… पूर्ण जमेल!!
तेव्हाच तुझ्या अद्वैताची कथा
परमेश्वरा मी सगळ्यांना सांगेन
वेडे
दुःख आणि एकटेपणा
कुणाची पाठ सोडत नाहीत
कुणाला नको असूनही वेडे
माझ्याबरोबर थांबत नाहीत!!
मी प्रेम म्हणणार नाही
कितीही असहाय्य व्यथा सांग
मला कधीच कळणार नाही
अपूर्ण या व्यवहाराला
मी प्रेम म्हणणार नाही…
पूर्ण वाचा
चूक आणि बरोबर
चूक आणि बरोबर मध्ये
किती नाती दबली
सगळे सोबत असूनही
म्हणूनच घुसमट आहे आपली…
