रम्य ते बालपण आणि रम्य ते शाळेचे दिवस असं म्हटलं जातं. पण माझं डोकं नेहमीप्रमाणे उलटंच फिरतं. कधी कधी वाटतं देवाने माझा मेंदुच वेगळ्या पदार्थाचा बनवलाय. मला आठवतो शाळेचा पहिला दिवस. जेव्हा मी एकसारखे कपडे घातलेल्या कळपाचा भाग बनले. आणि एका मुलीने मी ग म भ न लिहीत असलेली पाटीच पुसली. ही एक गोष्ट चांगली झाली. जगात वावरताना खायच्या टप्प्या टोमण्याचं ट्रेनिंग इथे सुरू झालं. …
Tag: marathi articles
वस्तूसारखं वापरलं
नायक नायिकेला म्हणाला “तू मला वस्तूसारखं वापरलंस!” आणि मी विचार करत राहिले.. वस्तूसारखं??? मी तर वस्तू किती जपून आणि हळुवार वापरते. एकदा मी ग्रुप वर म्हटलं “मी वस्तुंना जवळचं मानते” आणि हा कल्ला… माणसं मिळत नाही म्हणून वस्तू?? हो! माणसं काय असतील नसतील. पण वस्तू इमाने इतबारे आपल्या सेवेसाठी हजर. तुटे फाटे पर्यंत. आणि अशा कितीतरी वस्तू डोळ्यांसमोरून जाऊ लागल्या…
कांदेपोहे
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोहे… हे गाणं ऐकलं तेव्हा वाटलं उगाचच हां… अतिशयोक्ती! पण प्रत्यक्ष लग्नाच्या आखाड्यात पाय ठेवले तेव्हा फोडणीत ढवळून निघणं म्हणजे काय याची प्रचिती आली.
पहिला मुलगा बघायला आला तेव्हा मी नेहमीसारखी हसत बाहेर आले आणि सगळ्यांकडे बघत बसले. मुलाकडच्यांनी प्रश्न विचारले तेव्हा मीही काही प्रश्न विचारले. हिला आधीच ट्रेनिंग द्यायला पाहिजे होत अशा अविर्भावात सगळे माझ्याकडे बघत राहिले. आणि मी अजाण बालक! पाहुणे निघून गेले आणि मुलाकडच्यांसमोर आलीस कि इंटरव्ह्यू द्यायला म्हणत सगळ्यांनी माझी खरडपट्टी काढली. मुलगी थोडी फॉरवर्ड आहे असं म्हणत मुलाकडच्यांचा नकार आला.
पूर्ण वाचा
आठवणींच्या जाळ्यात
मधल्या जागेतून तेव्हाच्या स्वयंपाक घरात जाताना वाटेत आई म्हणजे माझी आजी आदाळयावर करली कापत बसलेली असतांना दिसते ….. ते माशाचं सळसळण … आणि वाटतं बरंच काही हरवलंय….. शनिवारची अर्धा दिवस शाळा… मम्मी घरी असल्याची गोडुली भावना… तिने काहीतरी स्पेशल च बनवलेलं असत… कधीचा तरी चविष्ट अंडा राइस आठवतो… आणि गोड शेवयांचा जर्मन चा डब्बा… असं वाटतं बरंच काही हरवलंय… चार वर्ष मोठ्या दादाने मेहनतीने खांद्यावर उचलून आणलेलं असतं मला शाळेतून…आणि एक रस्त्यावरची आगावू बाई म्हणते “एवढी मोठी झालीस… चालता येत नाही ?” मला आपलं उगाच वाटतं हिला माझं सुख बघवत नाहीय… शाळेत जायचं नसलं की अर्ध्या रस्त्यावर पोटात दुखायचं नाटक… की दादा परत घरी आणणार… आठवलं की वाटतं बरंच काही हरवलंय…