दुःख आणि एकटेपणा
कुणाची पाठ सोडत नाहीत
कुणाला नको असूनही वेडे
माझ्याबरोबर थांबत नाहीत!!
Tag: marathi poems
मी प्रेम म्हणणार नाही
कितीही असहाय्य व्यथा सांग
मला कधीच कळणार नाही
अपूर्ण या व्यवहाराला
मी प्रेम म्हणणार नाही…
पूर्ण वाचा
चूक आणि बरोबर
चूक आणि बरोबर मध्ये
किती नाती दबली
सगळे सोबत असूनही
म्हणूनच घुसमट आहे आपली…
चांदण्या
छोट्या छोट्या चांदण्यांनी
आभाळ भरण्यात जी मजा आहे
तिच्यासाठी आकाशाला गवसणी घालण
सोडलं तरी चालत….
तिच्या डोळ्यात
तिच्या डोळ्यात
माझ्यासाठी
तरळणारे अश्रू
कदाचित
या शून्य डोहात
तरंगण्यासाठी आखलेल्या
अर्थपूर्ण लहरी असतील
अद्वैत
भ्रम आणि सत्य
यातलं अद्वैत जाणवल
की आपल जगणं
एक अभेद्य प्रश्न असू शकत
किंवा निर्णायक उत्तर
वेळप्रसंग
ओळखीची प्रेमळ नजर
वेळप्रसंगी दगड होते
आयुष्याच्या अर्थाची धमनी
तेव्हा तिथेच थिजून जाते…
कृती
विचार केला वाईट घटनेचा
तर वेगवेगळे फाटे फुटत जातील
अर्थांच्या जाळ्यांनी
मनाचे गाभारे घुसमटत राहतील
खोटेपणाच्या मागेही
खरं असत उभ
मुक्त होऊन सगळ्यातून
कृती करत राहशील
तरच जगत राहशील
