जेव्हा स्पर्श करतात
नाजूक फुलपाखरं
आणि हळूवार फुलतात
स्वप्नांची फुल
तेव्हा आतल्या काळोखातून
खेचणाऱ्या भूतांमुळे
स्वतःचीच भीती वाटते
Tag: marathi poems
हवं तसं
करायचं ते करायचं
जगायचं तसं जगायचं
आयुष्यच तर आहे…
आपल्याला हवं तसं
त्याच्याकडे बघायचं!!!
झळाळी
जाणवतय का तुला
ती दुःखाची धीर गंभीर तान
खोल गर्तेतून येणारी
ती सोनेरी कडा आहे
आनंदाला झळाळी देणारी…
जिव्हाळा
त्याने दिली होती
हृदया वरची
ती खोलवर गेलेली
सुकून उरलेली
काळीकुट्ट जखम
आणि कदाचित
स्वप्नांना कचकन पडलेला
सर्वात मोठा तडा
तेव्हाचाच होता…
फिरून पुन्हा जेव्हा…
पूर्ण वाचा
मोक्ष
कुणाच्या दुःखाने
क्रूर सुख मिळत!
कुणाच्या दुःखापेक्षा
आपल दुःख छोट वाटत..
पण क्वचितच
पूर्ण वाचा
आता तरी सोड!
आता तरी सोड ते
मुळू मुळू रडणं
झालेल्या घटनेचा घासून घासून
पूर्ण कीस काढणं
आता तरी मुक्त कर
भूतकाळाच्या भुतांना…..
पूर्ण वाचा
तशी तर…
तशी तर रागावण्यासाठी
बरीच कारणं आहेत
पण मनाचा तोल सांभाळायला
शांत राहणं भाग आहे
तशी तर रडण्यासाठी
बरीच कारणं आहेत…
पूर्ण वाचा
तेव्हा आपण “जगतो”
सळसळणाऱ्या पावसात
प्रेम धुंद होऊन
हातात हात गुंफतो
तेव्हा आपण “जगतो”
मैत्रीच्या बैठकीत
हास्याच्या जल्लोषात
भान विसरून रमतो
तेव्हा आपण “जगतो”
एकांताच्या ध्यान मंत्रात
स्वतःचा मोकळा सूर…
पूर्ण वाचा
