Marathi Poems

कृती

विचार केला वाईट घटनेचा
तर वेगवेगळे फाटे फुटत जातील
अर्थांच्या जाळ्यांनी
मनाचे गाभारे घुसमटत राहतील
खोटेपणाच्या मागेही
खरं असत उभ
मुक्त होऊन सगळ्यातून
कृती करत राहशील
तरच जगत राहशील

Marathi Poems

वळण

त्या वळणावर आले
तेव्हाच जाणवल होत
आता अश्रूंचा पाऊस पडणार
खूपशा कविता झडणार
माझं मन माझ्याशीच लढणार
दुःखाने jam-packed
दिवस आणि रात्र असा
यातून पण आनंदात यायला शिकवणारा
Power-packed अनुभव घडणार