राऊत आजोबा यशोदाची आतुरतेने वाट बघत होते. वास्तविक एक आठवडा होता सुरज आणि सूनबाईना यायला. पण राऊत आजोबांचं वय वीस वर्ष कमी झालं होतं त्यांच्या येण्याची बातमी ऐकून. यशोदा आज सगळं घर कानाकोपऱ्यातून झाडून घेणार होती. सगळी ठेवणीतली भांडी घासून घेणार होती. दोन वर्षांनी येणार होते सुरज आणि फॅमिली. नातवंड श्रेया आणि समीर आता प्रत्येकी सहा व दहा वर्षांचे झाले होते. दोन वर्षात आपल्याला विसरले तर नसतील अशी राऊत आजोबांना धास्ती होती. एक आठवडा काय फटाफट जाईल.
Tag: short stories
“मी”
“गण्या…. कुठे मेलास… लवकर आण मिसळ पाव यांची….”
‘मालक नेहमीच असे ओरडतात… कस्टमरला असा स्पेशल मस्का लावल्याने कस्टमर वाढतात का? कुणाला माहीत… जेव्हा माझं हॉटेल होईल तेव्हा कळेल… वा स्वतःच्या हॉटेल च्या कल्पनेने भारी वाटतं… पण आपल्याला जमेल का… होईल का स्वप्न पूर्ण? कसं होईल कुठून येतील पैसे, मदत… त्या सीक्रेट वाल्या पुस्तकात वाचलं होतं… मनापासून इच्छा असली आणि व्यक्त केली की सृष्टी ते घडवून आणते… खरं असेल का ते… मग आई का गेली… मी नेहमी तिचं दीर्घायुष्य मागत असायचो… शी नको… जाम वात आणतात हे विचार डोक्याला… डोक्याला बटण हवं होतं चालू बंद चं… गणेश चं परिस्थिने गण्या वेटर झाल्याचं तरी कुठे मी मनात आणलं होतं? काका काही झालं तरी आपलं शिक्षण पूर्ण नाही करू शकणार… स्वतःच्या मुलांचं करायची जेमतेम क्षमता… मी वेटर म्हणूनच आयुष्यभर जगलो तर…
मी माझी माझ्यासाठी
रेवती ने गाडी पार्क केली. ऑफिस च्या कामाच्या रगाड्यात ती थकून गेली होती. त्यातून कुक रजेवर. डेडलाईन गळ्याशी असताना असं घरचं पाहायला घरी निघून येणं तिच्या बॉसला काही आवडत नव्हतं. नीलची पण परीक्षा होती. त्यात राकेशच्या ऑफिसमध्ये काहीतरी पॉलिटिक्स चालू होतं. तो रात्रीची काही न काही स्टोरी सांगत राही आणि रेवती चा थकून डोळा लागत असे. कालच त्यावरून राकेश चिडला होता. तुला माझी काळजीच नाहीय. वगैरे वगैरे पर्यंत तो आला. रेवती चिडखोर नव्हती पण तिची पण फार ओढाताण होत होती घर आणि ऑफिस मध्ये. तोल नकळत सुटतोच अशा वेळी.
नील बागेत खेळत होता.
रेवती: “नील…नील… चल लवकर वर…उद्याच्या पेपर ची तुझी तयारी बघू…”
अभिनंदन
मोबाईल वाजला. निषाद ने फोन उचलला.
निषाद: “हा अभिमन्यू. मित्रा तू सिलेक्ट झाला आहेस… अभिनंदन! मला एम. डी. म्हणत होते सॉलिड माणसाचं रेकमेंडेशन केलंस म्हणून… हो ऑफिशिअली फोन येईलच तुला…”
दुसऱ्या दिवशी मीटिंग रुम मध्ये सगळे बसले होते.
डील विथ इट!
राहान आपल्या परीने भराभर नोट्स लिहीत होता. पण सगळ्यांचं लिहून झालं तरी त्याचं संपत नसे. सर त्याच्यासाठी थोडा वेळ जास्त थांबत असत. आईने त्याची ही भाषांमधली कमतरता ओळखून त्याला अशा शाळेत घातलं होतं जिथे अभ्यासातील प्रगतीवरून वर्गवारी करून अभ्यासात प्रगती नसणाऱ्या मुलांकडे विशेष लक्ष देण्यात येत असे. सरांच लक्ष नाही असं बघून नमीत राहान च्या डोक्यावर पेन मारत होता. आणि प्रत्येक पेनाच्या माऱ्याबरोबर त्याला डंबो, स्लो मोशन, डफर असं म्हणत होता. राहान रागाने त्याला विरोध करत होता पण लिखाण संपवायची शर्यत त्याला फार विरोध करू देईना. राहान अस्वस्थ होत होता, चिडत होता. पण सरांना तरी किती वेळा सांगणार. नमीत सुधारत नव्हता. नेहमी राहान ला त्रास देत राही.
मोकळीक
‘ट्रेन दुरून दिसायला लागली आणि सगळे सावरले. अशा वेळेला हृदयाचे ठोके वाढतातंच माझे. ट्रेन जवळ जवळ येते आणि सगळे बॅगा, सामान सावरतात तेव्हा हेच ते भयानक आयुष्य असं वाटून जातं मला. ट्रेन थांबता थांबता सगळे आक्रमण करू लागले. मीही जोर काढून मुसंडी मारली. खिडकीचा मोह नसतो मला पण सी. एस. टी. येईपर्यंत बसायला चौथी सीट तरी. अरे… ऐन वेळेला जेवणाचा डबा निसटला खांद्यावरून. असा कसा निसटला… कळलंच नाही… आपण नियतीच्या हातातलं कळसूत्री बाहुलं आहोत हे मला आता शंभर टक्के पटलं. आतापर्यंत योगायोग म्हणून सगळे अंधश्रध्दा वाटणारे विचार आपण टाळत आलो. पण असं अजिबात नाहीय. डबा उचलण्याच्या अथक परिश्रमात पूर्ण अवसान घात झाला होता. सगळे धक्काबुक्की करू लागले. मागचे “अरे क्या हुआ… क्या हुआ” म्हणून ओरडू लागले. आणि सगळ्या बाजूने लोटालोटी करून लोकं ट्रेन मध्ये शिरली. डबा उचलून कसाबसा मी शेवटी चढलो. पण गर्दीचा समुद्र नुसता उफाळला होता. काठ काही मिळेना. सगळ्या सीट भरल्या होत्या. आपण कपाळ करंटेच. उलट आज बसायची गरज होती. जीव नुसता थकून गेलाय मीनाक्षीच्या बोचऱ्या बोलांनी.’
गरज
‘आज ट्रेन ची गर्दी जास्तच त्रासदायक होती. कधी एकदा घरी जाऊन बिछान्यात कोसळते असं झालं होतं. शक्तीच नाहीशी झाली होती.
धादांत खोटा आरोप होता माझ्यावर!
समज
‘घणाघणा अलार्म वाजतो आणि खडबडून जाग येते. हे नेहमीचं, तरी अजून सवय झाली नाही. मागच्या वेळी मंदा आत्त्या धडपडून पडली. पश्चाताप झाला गाढ झोपले त्याचा! होउ शकतं ना कधीतरी. नथिंग इज इन्फ़ोलीबल. आत्या सुद्धा पडू शकते, त्यात काय! दमले आहे खरंतर मी!! आत्या वारल्यावर दुःख होईल… की आनंद…’ हा विचार तिने दाबून टाकला!
‘मंदा आत्त्याने मला लहानपणापासून सांभाळलं. मला काहीच धड जमलं नाही म्हणून मी दिवसभर आत्त्याला सांभाळते, आत्त्याचं कुणी नाही म्हणून आत्त्याला सांभाळते, की आत्त्याच्याच पैशावर मी अवलंबून आहे म्हणून आत्त्याला सांभाळते…’ हे ही विचार इतर विचारांसारखे दाबून टाकले. ‘आयुष्य एक भयानक रुटीन झालंय. मंदा आत्त्याचा आजार मलाच गुरफटून राहिलाय. कधी वाटतं या लंग फाय्ब्रोसीस ची सवय झालीय मला, पण नाही. झोपेचं खोबरं होतं आणि डोक्यावर आठ्या पडतातंच. मनात चीड येते. मग मी मुद्दाम आत्तेच्या डोक्यावरून हात फिरवते. तिला माझी ही चीड समजू नये म्हणून की काय… असेल… नथिंग इज इन्फ़ोलिबल! माणूस सवयींचा गुलाम असतो. पण फक्त व्यसनाधिन सवयींचा…’
*********
दरवाजावर बेल वाजली आणि गितिकाने दरवाजा उघडला.